Mohammed Shami : 14 ओव्हर 9 मेडन अन् 2 विकेट्स! टीम इंडियाच्या दरवाजावर ‘नॉक नॉक’, मोहम्मद शमीची आग ओकणारी बॉलिंग!
रणजी स्पर्धेच्या 2026 पहिल्या मॅचमध्ये बंगाल आणि दिल्ली या दोन बलाढ्य संघांमध्ये एक चुरशीची मॅच रंगली आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार बॉलर मोहम्मद शमीने चमकदार कामगिरी करून दाखवली.
मोहम्मद शमी याने रणजी ट्रॉफीच्या सामन्यात पुन्हा एकदा आपल्या घातक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीची चुणूक दाखवून दिली आहे. दिल्लीच्या चिवट बॅटर्सविरुद्ध शमीने आपल्या 14 ओव्हर्सच्या कोटमध्ये तब्बल 9 ओव्हर्स मेडन टाकल्या.
