November 6, 2026

87 लाखाच्या बदल्यात कोट्यवधींचं कर्ज, पुण्यातील शिक्षण संस्थाचालकानं आनंदानं केली डील, पैशांची बॅग उघडताच फुटला घाम

0
image

पुणे : कोट्यवधी रुपयांचे कर्ज सहज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका शिक्षण संस्थाचालकाची तब्बल ८७ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. कर्जाचे चेक न वटल्याने पैसे परत मागितले असता आरोपींनी ६ बॅगा आणि २ पेट्या दिल्या. यात पैसे असल्याचं सांगितलं. बॅगा आणि पेट्या जड असल्यानं संस्थाचालकालाही हे खरं वाटलं. मात्र त्या पेट्या उघडल्यानंतर त्यातून चक्क वृत्तपत्रांची रद्दी, विटा, चादरी आणि उशा निघाल्याने संस्थाचालकाला मोठा धक्का बसला. या ‘फिल्मी स्टाईल’ फसवणुकीप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनुप दिवेकर (वय ४२), आनंद दिवेकर (वय ४४, दोघे रा. निगडी प्राधिकरण) आणि देशमुख नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ‘जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे संस्थापक सुधाकरराव उद्धवराव जाधव (वय ६५, रा. नऱ्हे) यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. ही फसवणुकीची घटना २५ डिसेंबर २०२३ ते जून २०२६ या कालावधीत घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *