November 6, 2026

2023मध्ये काढली IPS ची पोस्ट, महिला IPS सोबत लव्ह मॅरेज, आता आदित्य सिंह यांचा तडकाफडकी राजीनामा

0
image

IPS Aditya Kumar Singh Resigns: अपेक्षाभंग झाल्याने भारतीय प्रशासकीय विभाग किंवा पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नोकरी सोडण्याचं प्रमाण सातत्याने चर्चेत येत आहे. गेल्या काही काळात बऱ्याच बड्या अधिकाऱ्यांनी तडकाफडकी सरकारी नोकरी सोडली आहे. आता यात आणखी एक भर पडली आहे. महाराष्ट्र कॅडरचे २०२३ बॅचचे तरुण आयपीएस अधिकारी आदित्य कुमार सिंह यांनी अवघ्या तीन वर्षांच्या सेवेनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *